मुंबई : ‘वडापाव पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारची आठवण येते,’ असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
मुंबई येथील वडापाव महोत्सवात राज ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी वडापावबद्दल अनेक किस्से सांगितले. ठाकरे म्हणाले, ‘हे ठिकाण राजकीय नाही. पण गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारची आठवण येते. कारण सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मधला उपमुख्यमंत्री अजित पवार हे वडा आहेत की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामधला एकनाथ शिंदे हे वडा आहेत हे समजत नाही’, असे म्हणत ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
वडापाव हा अनेक ठिकाणी पोहोचला आहे. शिवाजी पार्क जिमखाना येथे वडापाव खात ही बीबीडी चाळ उभा राहिली. वडापाव ही चवीचा विषय आहे. वडापाव महोत्सवात अनेक स्टॊल लागले आहेत. त्यांना ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वडापाव संकल्पना आणलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली आहे.