करमाळा : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील विद्यार्थिनीने मुंबई येथे सुरु असलेल्या SAI स्पोर्ट अथॉरेटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या खेलो इंडिया पिंच्याक सिलॅट कराटे स्पर्धमध्ये महाविद्यालयाच्या खेळाडु श्वेता दळवी (12 वी) विज्ञान हिने सिल्व्हरपदक जिंकत आपल्या महाविद्यालयाचे, तालुक्याचे व जिल्हाचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. या यशस्वी विद्यार्थिनीला क्रीडाशिक्षक उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, प्रा. रामकुमार काळे व नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले.