करमाळा (सोलापूर) : भाजपच्या वतीने १२ ते २६ जानेवारी दरम्यान ‘नमो चषक’ होणार आहे. यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. या स्पर्धेसाठी १० जानेवारी नावनोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुका सरचिटणीस सरपंच काकासाहेब सरडे यांनी दिली आहे. सरडे हे ‘नमो चषक’ स्पर्धेचे करमाळा विधानसभा समन्व्यक आहेत.
सरडे म्हणाले, ‘भाजपच्या वतीने राज्यात ‘नमो चषक’ भव्य क्रीडा व सांस्कृतिक मोहोत्सव होत आहे. त्यानुसार करमाळा तालुक्यात विविध खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये कुस्ती, फुटबॉल, खो- खो, हॉलिबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कब्बडी, आथलॅटिक्स, कुस्तीचा समावेश आहे. याशिवाय चित्रकला, रांगोळी, गीत गायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धाही होणार आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे करमाळा विधानसभा प्रमुख गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार आहेत.