नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ही शपथ दिली आहे. यावेळी नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, अमित शहा, राजनाथसिंह, निर्मला सीतारामन आदींचा शपथविधी सोहळा झाला.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आज हा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. भव्य असा हा शपथविधी सोहळा असून यासाठी देशातील सामाजिक, राजकीय, कला, क्रीडासह सर्व क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित आहेत. यासह शेजारील देशातीलही प्रमुखांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत.
या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अक्षयकुमार, पंकजा मुंडे, मनोहरलाल खट्टर, एचडी कुमारस्वामी आदी उपस्थित आहेत. (शपथविधी अजून सुरु आहे.)