NCP gave the post of Maharashtra state president to a loyal and honest worker

करमाळा : तालुक्यातील रावगाव येथील पंडित कांबळे यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, फुले शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे चळवळीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पंडित कांबळे हे राष्ट्रवादीत पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत आत्तापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण पदावर सक्रियपणे व उत्कृष्टपणे काम केले आहे. पुणे शहराचे नऊ वर्ष ते अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून केले. गाव, तालुका, जिल्हा, विभाग, पातळीवर मेळावे, प्रशिक्षण, शिबिर, कार्यशाळा, घेऊन उत्कृष्ट संघटना बांधणी केली आहे. शरद पवार व ॲड. जयदेवराव गायकवाड यांच्या उपस्थितीत पुणे येथे अनुसूचित जातीमधील 59 घटक जातीच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा येथे भव्य मातंग परिषद आयोजित करून मातंग समाजाच्या समस्या व प्रमुख मागण्यांचा आढावा शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषद आयोजित केली होती.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *