करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी जाहीर

New Executive Committee announced in Annual General Meeting of Karmala Lawyers Association

करमाळा (सोलापूर) : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे व उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ॲड. विकास जरांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये अध्यक्षपदी ॲड. सोनवणे, उपाध्यक्षपदी ॲड. देवकर यांच्यासह सचिव म्हणून ॲड. विनोद चौधरी, सहसचिव म्हणून ॲड. सुनील घोलप यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. पी. लुणावत, ॲड. एस. पी. रोकडे, ॲड. भाऊसाहेब वाघमोडे, ॲड. बाबुराव हिरडे, ॲड. ए. एस. गिरंजे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. राजेश दिवाण, ॲड. सविता शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *