Official Mahapuja of Shri Vitthal Rukmini by Deputy Chief Minister Fadnavis on the occasion of Kartiki EkadashiOfficial Mahapuja of Shri Vitthal Rukmini by Deputy Chief Minister Fadnavis on the occasion of Kartiki Ekadashi

पंढरपूर : येथे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवारी) पहाटे झाली. यावेळी नाशिकचे बबन व वत्सला घुगे या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला.

आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्या असतात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखों वारकरी पंढरपूरला येतात. या वारीसाठी साधारण आठ लाख वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. ‘आपल्या समाजामध्ये एेक्य टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला वारकरी व्हावे लागेल’, असे मत फडवणीस यांनी यावेळी व्यक्त केले आहे. ‘प्रत्येक समाजाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. ते करत असताना दुसऱ्या समाजाला दुखवू नये. सामाजिक एेक्यला बांधा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पंढरपूरमधील विकास कामे लवकरच मार्गी लागतील, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *