मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार करमाळ्यात मराठा समाजाचा चक्काजाम

On the orders of Manoj Jarange the Maratha community rioted in Karmala

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार करमाळा येथे आज (शनिवारी) दुपारी ४ वाजता श्रीदेवीचामाळ रोड बायपास चौक येथे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. सकल मराठा समाज शहर व तालुकाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाशी (मुंबई) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सगेसोयऱ्याचे अध्यादेशाची अमलबजावणी करावी व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले आहे. दरम्यान राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षणही दिले आहे. मात्र मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंच्या अधिसूचनेही अमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *