Senior Citizen Day became memorable with the initiative of a doctor coupleSenior Citizen Day became memorable with the initiative of a doctor couple

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणीधारी संकुलात आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून डॉ. गुरूदेव हत्ताळी व डॉ. पुनमताई हत्ताळी या दांपत्यानी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा सोहळा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. या दिनाच्या औचित्याने ज्येष्ठ मंडळींना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून त्यानी गुलाबपुष्प देत सर्वांचे अगत्यपुर्वक स्वागत केले आणि यथोचित सन्मान केला.

सुरूवातीला मंडळाचे सचिव संजय जोगीपेटकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. संस्थापक अध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी आपल्या भाषणात, ‘वैद्यकीय व्यवसायातील या उभयतांनी आजचा हा दिवस संस्मरणीय बनविला आहे.’ असे सांगत पुढे म्हणाले की, ‘अडचणीत धावून येतो तो मित्र या न्यायाने वार्धक्यामध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक कटकटी दूर पिटाळणारे डॉक्टर हेच ज्येष्ठांच्या आयुष्यातील खरे मित्र असतात. या दाम्पत्यांनी आपल्या सेवाभावी अनुभूती बरोबर आज त्या मैत्रभावनेचीही गोड प्रचिती आणून दिली आहे.’

यावेळी सिद्रामप्पा गोविंदे, दौलतराव भैरामडगी, विश्वनाथ काळे, मल्लिकार्जुन गोरंटी, दत्तात्रय झाडे, प्रभुदेव मसुती, रमेश नंदूर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी प्रामुख्याने उपाध्यक्ष मल्लप्पा मुळजे, अंकुश माने, श्रीनिवास चिट्टमपल्ली, त्र्यंबक जाधव, हनुमंतू गजेली, शाम गांगजी, गुरूशांतप्पा गाडी, भीमाशंकर शिवगुंडे, राजशेखर चोळ्ळे, किसनराव जाधव, शिवाजी क्षीरसागर, संगण्णा खजुरगी, नारायणसा बुरबूरे, नागेश कन्ना, भालचंद्र कलशेट्टी, सुभाष आमले हे उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *