करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी चार अर्ज दाखल

On the third day four applications were filed for the election of the Karmala Agricultural Produce Market Committee

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे (बुधवारी, ६ तारखेला) दुपारी ३ वाजेपर्यंत चार अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारणमध्ये अण्णासाहेब पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे. याच मतदार संघात इतर मागासवर्गमध्येही त्यांनी उमेदवारी अर्ज केला आहे. एससी मतदारसंघात औदूंबर मोरे व सुहास ओहोळ यांचा अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत. १८ जागांच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह २५ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार (ता. ८) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *