करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीची करमाळा तालुका कार्यकरणी आज (शुक्रवारी) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याचे दिसत असून तालुक्यातील जास्तीत जास्त गावातील कार्यकर्त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे विश्रामगृह येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पत्र देऊन तालुकाध्यक्ष भारत आवताडे व कार्याध्यक्ष सुजित बागल यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.
यामध्ये चौघांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. उदय ढेरे, अमोल भोसले, देवा लोंढे व सोमनाथ रोकडे यांची निवड झाली आहे. करमाळा- माढा विधानसभेच्या मतदार संघात अॅड. अजित विघ्ने यांची प्रवक्ते, बबनराव मुरूमकर यांची सचिव म्हणून तर सुभाष अभंग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
तालुका कार्यकारणीमध्ये सरचिटणीस म्हणून अमोल फरतडे, चिटणीस म्हणून चंद्रकांत जगदाळे, प्रवक्ता म्हणून डॉ. गोरख गुळवे, खजिनदार म्हणून गणेश गुंडगिरे, सचिव म्हणून विशाल सरडे, सहसचिव म्हणून प्रशांत शेंडे, प्रसिद्धी प्रमुख अमोल चाळक व कार्यकारणी सदस्य म्हणून रविंद्र नवले यांची नियुक्ती झाली आहे. या सर्वांना आमदार शिंदे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आहे. सरपंच तानाजी झोळ, अभिषेक आव्हाड, अशपाक जमादार, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, राजेंद्र धांडे, माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, तुषार शिंदे, माजी सरपंच संतोष वाघमोडे, गजेंद्र बोराडे, भीमराव येवले, भुषण पाटील, दादा पाटील, बबनराव मुरुमकर आदी उपस्थित होते.