करमाळा (सोलापूर) : स्थापत्यशास्त्रचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कमलाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठचे (पिंपरी पुणे) कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी पाच लाख देणगी दिली आहे. डॉ. पाटील यांनी गेल्या आठवड्यात या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. या कामासाठी देणगी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आश्वासनाची पूर्तता डॉ. पाटील यांनी आठ दिवसांतच केली.

डॉ. पाटील यांचे प्रतिनिधी मनोज नायडू यांनी पाच लाखांचा धनादेश कमलादेवी देवस्थान ट्रस्टकडे सुपूर्त केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त उपस्थित होते. यावेळी श्री. नायडू यांनी डॉ. पाटील यांच्यावतीने ट्रस्टचा सत्कार स्वीकारला.

डॉ. पाटील यांनी आपल्या भेटीत मंदीर परिसराची पाहणी केली. त्या वेळी ते म्हणाले ‘‘पुरातन मंदीरं ही आपला सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्यकलेचा वारसा आहेत. त्याचे जतन व संवर्धन करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. त्याच उद्देशाने या कामासाठी मदत केली. मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील मूळ दर्शन भाविकांना मिळणार आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. समाजातील घटकांनी अशा कामात योगदान देणे गरजेचे आहे.’’

कमलाभवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर दाक्षिणात्य बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते. या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला आहे. या मंदिराची आखणी ४८ एकर परिसरात केली असून या मंदिराला एकूण ५ दरवाजे आहेत तर दारावर गोपुरे आहे. श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षभरापासून सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी विश्वस्त सुशील राठोड, ॲड. शिरीषकुमार लोणकर, पुरोहित शाम पुराणीक पुजारी, बापू पुजारी, रोहित पुजारी, तुषार सोरटे ,सहदेव सोरटे, सरपंच सिद्धेश्वर सोरटे, हनुमंत पवार, ॲड. बिभिषण सोरटे, शिवाजी पकाले, खंडू थोरबोले, यात्रा कमिटीचे आकाश सोरटे, रत्नदीप पुजारी, शंभु पवार, महेश पवार, आदित्य पवार व मानकरी सेवेकरी उपस्थित होते.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क – अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *