करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला आहे. पंढरपूर येथे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक जयंत देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश नलवडे, शिक्षक अभिजीत गायकवाड, हनुमंत आरेकर, ब्रह्मदेव नलवडे, संतोष नलवडे, सुभाष शेंद्रे, राजेंद्र जगदाळे, संपत नलवडे आदी यावेळी उपस्थित होते.

