पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षण

सोलापूर : जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सोलापूर येथील नेहरू नगर सधन कुक्कुट विकास गट येथे 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षण होणार आहे. इच्छुकांनी शनिवारपर्यंत (ता. 7) अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल. नरळे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 9 ते 23 डिसेंबरपर्यंत असून, प्रशिक्षाणार्थ्यांसाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 100 रुपये आकारण्यात येईल सोबत शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे.

सदर प्रशिक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एम. बोधनकर, सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, बी.पी.एड. कॉलेज जवळ, सोलापूर, यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *