कामोणे जिल्हा परिषद शाळेत जागतिक वन दिन व जलदिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : कामोणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक वनदिन व जलदिनानिमीत्त कार्यक्रम झाला. माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. वनपाल श्री. दोंड, वनरक्षक प्रदीप शिंदे, वनरक्षक श्री. गाडे व श्री. कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.

यामध्ये वनांचे महत्त्व व प्राण्यांची अन्नसाखळी यांचा असणारा घनिष्ठ संबंध तसेच वाढते तापमान व मानवी जीवनावर होणारा परिणाम, प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गभाले यांच्यासह सर्व शिक्षक, ग्रामीण परिसर विकास समितीचे अध्यक्ष विठ्ठल नलवडे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *