करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. श्री खंडेश्वर मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. या पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार रविंद्र वळेकर हे आहेत. तर सदस्य पदाचे उमेदवार अनिता पाटील, पुतळा सावंत, बळीराम सांगडे, गोदाबाई मारकड, समाधान वळेकर, दीपक गवळी, आशा वळेकर, सम्राट जाधव, चंद्रकला मोरे व पार्वती वळेकर हे आहेत. शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावात हलगीच्या तालात मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील पांढरी टोपी सर्वांचे लक्ष वेधत होती.
