करमाळा (सोलापूर) : सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात धरणे आंदोलन झाले. याबरोबर परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू यांचाही यावेळी निषेध करण्यात आला. करमाळा तहसील कार्यालयासमोर प्रा. रामदास झोळ व शेतकरी कामगार संघटनेचे दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. पीडितांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रा. झोळ म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांनी पावन असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना होणे हे न्यायव्यवस्थेला धरून नाही. दोषींना ताबडतोब अटक करून कडक कारवाई व्हावी. नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांच्या आश्वासनांनंतर धरणे आंदोलन थांबवण्यात आले. हरिभाऊ मंगवडे, गणेश मंगवडे, संजय जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे, अमोल घुमरे, रमेश कांबळे, औदुंबर भोसले- पाटील, सुदर्शन शेळके, तात्यासाहेब सरडे, भीमराव ननवरे, सुहास काळे, प्रवीण सुरवसे, भाऊसाहेब शिंदे, कांतीलाल शिंदे, श्रीराम भोरे, ऋषिकेश कांबळे, भाऊसाहेब पवार उपस्थित होते.