सोलापूर : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष सर्वेक्षणकरून वंचित घटकापर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या‘ माध्यमातून पोहोचविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी केले. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथून नुकताच शुभारंभ झाला.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, उपसरपंच सिद्धाप्पा हंजगी, विस्तार अधिकारी पी. सी. पाटील, आर. एस. राठोड ग्रामसेविका सुनीता राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. शेळकंदे म्हणाले, ग्रामस्तरावर विविध योजनांची परिपूर्णता साधण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम सोलापूर जिल्ह्यात 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी आठ वाहने केंद्र सरकारने परिपूर्ण उपलब्ध करून दिली आहेत. या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हळे यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, केंद्र शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु अद्यापी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचण्यात येणार आहे संभाव्य लाभार्थ्याची नोंदणी करणे नागरिकांशी वैयक्तिकचित्रफितीद्वारे संवाद साधून त्यांना योजनेबद्दल माहिती देणे या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वाघ म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या अनुभव देखील व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावेत जेणेकरून इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल योजनेची माहिती मिळेल तसेच नागरिकांना शासकीय योजनांची माहितीसाठी जिल्हा ते गाव गावपातळीवरती चित्र चित्रकथाद्वारे जिंगल पोस्टर्स छायाचित्र ध्वनी चित्रफीत आदी माध्यमातून प्रत्यक्ष प्रसिद्धी करण्यात येत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हाने त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांना आपला संकल्प विकसित भारत याबाबत शपथ देण्यात आली. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंतोदय योजना, पंतप्रधान आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम किसान सन्मान योजना,पोषण अभियान, जल जीवन मिशन,खेड्यात सुधारित तंत्रज्ञान सह मॅपिंग, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना , अटल पेन्शन योजना, इत्यादी योजना बाबत माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी शिल्पा कसबे, केव्हीके शास्त्रज्ञ अमोल शास्त्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखावत, विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर मिलिंद जयकर प्रगतशील बागायतदार महालिंगअप्पा बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप देखील करण्यात आले.
जिल्ह्यात आठ चित्र रथाद्वारे जनजागृती
विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकापर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवून योजनांचा प्रसार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी आठ चित्ररथ देण्यात आलेले असून याद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व महानगरपालिका नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रत्येक वार्ड मध्ये चित्ररथ पोहोचून केंद्रीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे तर शहरी भागात चित्ररथ प्रत्येक वार्डापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे.