करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर दिनदर्शिका कॅलेंडरचे ऍड. नितीनराजे भोसले यांच्या निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. यावेळी रयत क्रांतीचे संतोष वारगड, पत्रकार सुनील भोसले, जिंतीचे माजी सरपंच अर्जुन वारगड, खतगावचे अविनाश मोरे, जिंती सोसायटीचे माजी चेअरमन सिंकदर मुलाणी, रयतचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, विनोद चव्हाण, बलभीम पोटे, हारी धेंडे, राम गर्जे, महेंद्र देवकर, जितेश धेंडे, राम वाघमोडे, सागर जगताप, दशरथ गुंजाळ, अतुल धेंडे, तानाजी चव्हाण, जगन्नाथ चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप जगताप यांनी परिश्रम घेतले.

