Trailer launch of the movie which will be released on 19th January

अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. ‘८ दोन ७५’ म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

“८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा “८ दोन ७५”: फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *