करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी शासकीय तूर हमीभाव केंद्र सुरू झाले आहे. येथे 7 हजार 550 प्रमाणे शासकीय हमीभवाने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. मांगी (ता. करमाळा) येथील विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेसह जिल्ह्यातील आठ संस्थाच्या अध्यक्षाना याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्याच्या सातबारावर (2024- 25) तूर नोंद असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक पासबुक व आठ अ आवश्यक आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल यांनी सांगितले आहे.
करमाळ्यात शेतकऱ्यांकडून हमीभाव दराने तूर खरेदी सुरू
