करमाळा (सोलापूर) : रेडिओ दिवसानिमित्त रेडिओप्रेमी बाळासाहेब पवार यांचा सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या. पवार हे करमाळा तालुक्यातील हिवरवाडीचे माजी सरपंच आहेत. त्यांचे तहसील परिसरात हॉटेल आहे. १३ फेब्रुवारीला त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी नगरसेवक सतीश फंड, मकाईचे रमेश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, अशोक नरसाळे आदी उपस्थित होते.
१३ फेब्रुवारीला रेडिओ दिवस साजरा केला जातो. पवार हे अजूनही रेडिओवर गाणी ऐकतात. स्मार्ट फोन असला तरी हॉटेलमध्ये ते रेडिओवर जुनी गाणी ऐकतात. रेडिओ हे एक प्रभावशाली माध्यम आहे. रेडिओच्या माध्यमातून संगीत, माहिती, चर्चा आणि विविध कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचतात. बदलत्या काळात मोबाईल फोन असतानाही प्रवास करताना अजूनही अनेकजण रेडिओ ऐकतात. रेडिओमुळे एकाचवेळी अनेक नागरिकांशी माहिती पोहोचवता येते.
२०११ मध्ये रेडिओ दिवसाची सुरुवात झाली होती. २०१० मध्ये स्पेन रेडिओ अकादमीने १३ फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिन साजरा करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला.