करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्ये भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांसाठी आज (गुरुवार) सांयकाळी प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता देवी, नगरसेवक पदाच्या उमेदवार तारामती क्षीरसागर व निर्मला गायकवाड उपस्थित होत्या.
या प्रचारफेरीत भाजपच्या नेत्या रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, कन्हैयालाल देवी, माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांच्यासह उपस्थितांनी नागरिकांना करमाळा शहराच्या विकासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या फेरीला सुरुवात झाली. प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन त्यांनी नागरिकांशी सवांद साधला.
