करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाची परिस्थिती आरक्षण नसल्यामुळे बिकट झाली आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज व बहुजन समाजाने करमाळा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रा. झोळ हे जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. प्रा. झोळ म्हणाले, आरक्षणाशिवाय राज्यामध्ये इतर समाज बांधवांना सरकार आरक्षणाशिवाय अनेक सवलती देत आहे. राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वसतिगृहासाठी खूप सवलती देत आहे.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९४ हजार तर आरक्षितला २००० रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. ज्यांना कुठलेही शैक्षणिक आरक्षण नाही, तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारपेक्षा कमी आहे अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. त्याच पद्धतीने वस्तीगृहासाठी ही धनगर समाजाला आदिवाशीप्रमाणे आरक्षणा देता आले नाही तर २०१९ सारखा जीआरकाढुन शैक्षणिक सोयी सवलती देण्यात यावी.
EWS योजनेअंतर्गत राज्य सरकार ५० टक्के रक्कम देते. केंद्र सरकार सकारात्मक असेल तर केंद्र सरकारने ५० टक्के द्याव्यात. इतर समाजाला ६० टक्के देत मराठा समाजाला ५० टक्के देण्यात येऊन समाजास न्याय द्यावा. वसतीगृह भत्ता इतर समाजबांधवाप्रमाणे द्यावा, आज महाराष्ट्रात वैद्यकिय शिक्षणात एम. बी. बीएस, बीएचएमएस, बीएचएस, नर्सिग फिजोथेरपीला सरकारने सरकारी महाविद्यालयांना EWS लागु केले आहे. हे आरक्षण खाजगी महाविद्यालयांना ही करून फार्मसी, नर्सिंग, इंजिनीरिंग व आर्किटेक्चर कोर्सलाही लागू केले पाहिजे. त्याने जागा वाढून या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे.
ओबीसी, खुला प्रवर्गाप्रमाणे आहेत. सरकारने महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गाला ६०५ अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते तर इतर समाजाला १६०० अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते. त्याप्रमाणे आरक्षणाशिवाय सवलती लागु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची मागणी मान्य होणारच आहे. पण त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत मिळाली तर नक्कीच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य्य उज्वल होणार असल्याचे मत प्रा. झोळ यांनी व्यक्त केले.