करमाळा पंचायत समितीत झळकला रश्मी बागल यांचाही फोटो

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीत भाजप नेत्या पांडे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रश्मी बागल यांचाही फोटो झळकला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते स्व. अजितदादा पवार, माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो पंचायत समितीत सभापती व उपसभापती यांच्या कक्षात लागलेला होता. त्यांच्याबरोबर आता रश्मी बागल यांचाही फोटो झळकला आहे.

करमाळा पंचायत समितीची निवडणूक स्थानिक पातळीवर बागल व शिंदे हे एकत्रित लढले होते. शिंदे हे राष्ट्रवादीचे तर बागल हे भाजपचे आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा करमाळ्यात गटाचे राजकारण चालते. निवडणुकीचा निकाल होताच बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत हिवरवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब पवार यांच्या हस्ते दिगंबरराव बागल मामा यांचा पंचायत समीतीच्या सभापती कक्षात फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर सभापती व उपसभापती यांची निवड झाल्यानंतर पवार व शिंदे यांचाही फोटो येथे झळकला त्यानंतर आता रश्मी बागल यांचाही येथे फोटो झळकला आहे. करमाळा पंचायत समितीत सभापती पूजा ढेरे या बागल समर्थक आहेत. तर उपसभापती ऍड. विघ्ने हे शिंदे समर्थक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *