Collision between motorcycle and tractor near Jodlimb in Pothre One injuredCollision between motorcycle and tractor near Jodlimb in Pothre One injured

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील जोडलिंबजवळ झालेल्या अपघातप्रकरणात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा जामखेड रस्त्यावरील पोथरे येथील जोडलिंब येथे एक मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक झाली होती. यामध्ये मोटारसायकलस्वार जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत. गोकुळ माणिक जाधव (वय ४६, रा. जाधव वस्ती पोथरे) असे यातील जखमीचे नाव आहे.

यामध्ये जखमी जाधव यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक सुनील लगस (रा. पोथरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निष्काळजीपणे भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून मोटारसाकलस्वारास जखमी करण्यास कारणीभूत ठरल्यापकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. ट्रॅक्टर अचानक वळल्याने मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरच्या मागील चाकास धडकला. त्यात त्याच्या मोटारसायकलचे नुकसान झाले असून पायाला मार लागला आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात ११ मे २०२३ रोजी झाला होता.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *