पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थ नगर बावधन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण अभिवादन सभेच्या आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली, या अभिवादन सभेत बोलताना बावधन पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी सरपंच वैशाली कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उमेश कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं,

यावेळी माजी उपसरपंच तानाजी दगडे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, युवा नेते अभिजीत  दगडे, रेखा सरोदे, आशा भालेराव, विजया कांबळे, ज्ञानेश्वर साळवे, अजय पाचपुजे, अंकुश तिडके, संजय कांबळे, अविनाश कांबळे, राहुल कांबळे, संदीप कांबळे, आनंद कांबळे, यशराज कांबळे, रोशन खाडे संतोष सहजराव यांच्यासह बावधन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर चंदनशिवे यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *