Account holders whose land has been lost under the National Highway and Krishna basin should submit a demand proposal for compensationAccount holders whose land has been lost under the National Highway and Krishna basin should submit a demand proposal for compensation

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 13 सोलापूर विजापूर बाहयवळण / चार पदरी रस्ता हा उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातीतून गेलेला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.9 (नवीन क्र.65) हा माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यामधून गेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 13 सोलापूर विजापूर बाहयवळण व चारपदरी रस्त्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे , डोणगांव ,नंदूर ,बसवेश्वनगर , समशापूर , हिरज ,बेलाटी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे टाकळी , नांदणी , बसवनगर , मंद्रुप ,वडकबाळ , हत्तूर असे एकूण 13 गावचे काही बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 09 (नवीन क्र.65) पुणे- सोलापूर महामार्गासाठी माढा तालुक्यातील वेणेगांव , वरवडे , अरण , चव्हाणवाडी , टेंभूर्णी , रांझणी , मोडनिंब तसेच मोहोळ तालुक्यातील शेटफळ , मोहोळ , सावळेश्वर ,चिंचोळी , यावली , चिखली व उत्तर सोलापूर तालुक्यातीलल बाळे , केगांव , सोलापूर असे एकूण 16 गावांमधील काही बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

तरी वर नमूद गावचे बाधित खातेदारांना यापूर्वीच उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 11 कृष्णा खोरे सोलापूर या कार्यालयाडून राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 (1956 चा 48) आणि 1997 चे सुधारणा कायदा कलम 3G (1) (2) आणि 3H (2) (3) आणि 3E (1) (2) नोटीशीन्वये वारंवार सर्व बाधित खातेदारांना सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन नुकसान

भरपाई मिळणेकामी मागणी प्रस्ताव सादर करणेबाबत यापूर्वी कळवून सुध्दा अद्याप काही बाधित खातेदारांनी नुकसान भरपाई मिळणेकामी मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत. तरी वर नमूद महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जाणेकामी सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी.

सदरची मोबदल्याची नुकसान भरपाईची रक्कम घेऊन न गेल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 मधील तरतुदीनुसार तुम्हांस देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा न्यायालयात जमा करणेत येईल याची कृपया नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 तथा सक्षम प्राधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांना वेळ कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *