करमाळा (सोलापूर) : करमाळ्यातील विविध प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय घोलप यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांपुर्वी मनसेने घोलप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे व स्वच्छतासंदर्भात निवेदन दिले होते. दरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांनीही आढावा बैठक घेतली होती. त्यासंदर्भात पुढे काय झाले याबाबत घोलप यांनी आज (बुधवारी) चर्चा केली आहे. मनसेचे सतिश फंड, आझाद शेख, सचिन कणसे आदी उपस्थित होते. पाणीपुरवठ्याबाबत दुरूस्ती झाली आहे उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा होईल व आम्ही नविन मोटर संदर्भात आमदार शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव देण्यासाठी सांगीतले आहे. आमदार शिंदे यांनी अवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ व असे सांगितले.
मनसेचे घोलप यांनी घेतली पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट
