करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक फाऊंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना व बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त महाविद्यालयात संजीवनी पात्र लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व बुधभूषण फाउंडेशनच्या व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड, फाउंडेशनचे सदस्य राजेश पाटील, राहुल बागल, दादा देवकर यांच्यासह प्रा. हरिदास बोडके, प्रा. पल्लवी टोणपे, प्रा. स्वाती मोरे, प्रा. अश्विनी अडसूळ, प्रा. जयंत भांगे व एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी एनएसएसच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील सर्व झाडांवर संजीवनी पात्र बांधून हजारो पक्षांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय केली. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षांबद्दल आपुलकी, प्रेम व जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र कुतुहल निर्माण होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी संजीवनी पात्राचे सहकार्य सुशील राठोड, संदीप चुंग यांनी केले. तसेच या स्तुत्य उपक्रमासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व शरद कोकीळ यांच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने 10 संजीवनी पात्र देण्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एसच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.