करमाळा (सोलापूर) : शिवाजीनगर मंडळाचे सदस्य सुजित साठे यांचे चिरंजीव संकेत साठे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व नानासाहेब पायघन यांची कन्या सायली पायघन यांची कृषी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल शिवाजीनगर मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे. सत्काराप्रसंगी मंडळाचे सदस्य सूर्यकांत कांबळे, ॲड. लोनावत, मनिषा साठे, विजया सोनवणे यांच्यासह शिवाजीनगर मंडळातील सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुन्नेश जाधव यांनी केले तर आभार संग्राम पायघन यांनी मानले.

