‘शरद क्रीडा महोत्सव’चा आज रात्री अंतिम सामना; क्रिकेट प्रेमींना उपस्थित राहण्याचे वारे यांचे आवाहन

Santosh Ware appeals to cricket lovers to attend the final match of Sharad Sports Festival tonight

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या अभयसिंग जगताप करमाळा तालुका प्रीमियर लीग ‘शरद क्रीडा महोत्सव’चा आज (बुधवारी) रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण ही यावेळी केले जाणार आहे. यावेळी क्रिडाप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सवाचे निमंत्रक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी केले आहे.

६ जानेवारीपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर अभयसिंग जगताप करमाळा तालुका प्रीमियर लीग ‘शरद क्रीडा महोत्सव’ सुरु आहे. यामध्ये तालुक्यातील अनेक क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अंतिम सामनाही चुरशीचा होणार आहे. पत्रकार विशाल घोलप, नितीन चोपडे यांच्यासह इतर काही क्रिकेट प्रेमींनी वक्त्यांनी या क्रिडा महोत्सवाचे कॉमेंट्री केली आहे. बोरगावचे विनय ननवरे, सचिन गायकवाड, काँग्रेसचे प्रताप जगताप आदी सामने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, उप पोलिस निरीक्षक श्री. बंडगर यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उदघाटन झाले होते. आज या महोत्सवातील अंतिम सामना होणार असून त्याचे बक्षीस वितरण होणार आहे, यावेळी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन वारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *