Seduced and abducted a minor Recorded in Karmala Police

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दहिगाव येथील एका अल्पवयीन मुलीला पूस लावून अनोळखी व्यक्तीने पळवून नेले असल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित मुलगी जेऊर येथे शिक्षणासाठी एसटीने येत होती. मात्र तिला अनोळखी व्यक्तीने कशाची तरी पूस लावली आणि पळवून नेले आहे. यामध्ये मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून भारतीय दंड संहिता कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ३० तारखेला हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलगी शाळेत गेली होती. शाळेतून ती मैत्रिणीकडे जात आहे, असे सांगून शाळेतून गेली ती परत आलीच नाही. पालकांनी तिचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. तिला कोणी तरी कशाची तरी फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय नातेवाईकांना आहे, याचा पुढील तपास सुरु आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *