करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकी येथील केशव शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळा खडकी येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विदयालय करमाळा येथे व D.Ed चे शिक्षण बार्शी या ठिकाणी झाली आहे. त्याचे आई- वडील शेतकरी आहेत. त्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

