Shaikh of Mahatma Gandhi Vidyalaya passed the set examShaikh of Mahatma Gandhi Vidyalaya passed the set exam

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील बारावी सायन्सची विद्यार्थिनी फिजा शेख सेट परीक्षेत करमाळा तालुक्यात प्रथम आली आहे. तिला 99.43 टक्के गुण मिळाले आहेत. बारावीमध्ये देखील तिला ८६ टक्के गुण मिळाले होते.

फिजा शेख करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक येथील हिंदुस्तान फुटवेअरचे व्यवस्थापक जमीर शेख यांची ज्येष्ठ कन्या आहे. तिने सदरचे यश प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे विशेषतः मुस्लिम समाजाच्या वतीने अभिनंदन होत आहे. तिला मनोज थोरात, महेश पाटोळे, तसेच प्रा. तळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन तसेच रहेनोमा चॅरिटेबल ट्रस्ट याशिवाय बहुजन विकास संस्था व करमाळा मुस्लिम जमात यांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य कापले, हाजी आसिफ शेख, समीर शेख, इकबाल खान, इसाक पठाण, असलम शेख वस्ताद तसेच राजू बागवान यांनी तिच्या यशाबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *