करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल यांनी शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राहुल कानगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर यांनी दिले आहे. यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरण चौरे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, करमाळा शहर प्रमुख संजय शीलवंत, युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शहर प्रमुख मनोज शेजवळ, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे उपस्थित होते.

