Sound projector is allowed till 12 midnight for cremation ceremony of Shri Chhatrapati Shivaji Maharaj

सोलापूर : ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पुर्व संध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे.

सोलापूर जिल्हयासाठी 2024 मधील सण- उत्सव इत्यादी करीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देणेबाबत आदेश पारीत केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्र.3 अन्वये 2024 या वर्षामध्ये 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर माता, पत्नी, वीर कन्या यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो. याकरिता सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्याबाबत विनंती केल्याने 18 फेब्रुवारीला सुट देण्यात आली आहे.

ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. सदरची सूट सरकारमार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. याची दक्षता घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *