करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील म्हसेवाडी येथे पहिल्यांदाच एसटी बस सुरु झाली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यावेळी गावकऱ्यांनी एसटी बसची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या करमाळा आगारात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पत्रव्यहावर केला होता. याशिवाय इतर समस्यांबाबत विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. आगार प्रमुख वीरेंद्र होनराव यांनी ही बस सुरु केल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले.
करमाळा- पांडे- म्हसेवाडी ही बस सेवा सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. ही बस सुरु करण्यासाठी अंकुश पाटुळे व संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला. बस सुरू झाल्यानिमित्त पहिल्यांदा आलेल्या बसचे चालक नागनाथ चव्हाण व वाहक बालाजी तुंदारे यांचा ग्रामस्थांनी केला. अर्जुननगर- म्हसेवाडीचे उपसरपंच त्रिंबक ननवरे, चंद्रकांत पाटुळे, पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ, अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे, दीपक ननवरे, माधव पाटुळे, विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर, पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात, खंडु ननवरे, रमेश ननवरे, दीपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग, आबा पाटुळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.