ST failure as soon as Karmala exits the stand Passenger inconvenienceST failure as soon as Karmala exits the stand Passenger inconvenience

करमाळा (सोलापूर) : करमाळा एसटी स्टॅंडमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर एसटीचा बिघाड होऊन गाडी बंद पडली आहे यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. करमाळा- अक्कलकोट ही गाडी बंद पडली, असे सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे करमाळा प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पवार म्हणाले, पाच मिनिटाच्या अंतरावर करमाळा डेपोची बस बंद पडली. तरीसुद्धा एक तास प्रवासी दुसऱ्या बसची वाट पहात उभे होते. सकाळी साडेआठ वाजता ही एसटी बस बंद पडली होती. त्यानंतर पावणेदहाच्या दरम्यान दुसरी बस आली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *