start a college of Dattakala in two years to enrich Karmala educationally Zol mind

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याला शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी येत्या दोन वर्षांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू करणार असल्याचा मानस दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केला आहे. दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल केत्तुर नं 1 येथील वार्षिक स्नेहसंमेलनावेळी ते बोलत होते.

दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, मधुकर झोळ, अनुरथ झोळ, राजेश्वर शैक्षणिक संस्थेचे संस्थापक लालासाहेब जगताप, सुधीर खाटमोडे, संभाजी खाटमोडे, एकनाथ शिंदे, राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, आबासाहेब टापरे, श्रीकांत साखरे, गणेश जाधव, वाशिबेंचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे उपस्थित होते.

दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ‘अविष्कार 2023’ या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कला नृत्याच्या माध्यमातून आपली कला नृत्याच्या माध्यमातून सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विजय मारकड व त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *