An attempt to give courage from the husband The wife still has no idea who has gone and who has stayed the relatives of the accident victims cry out loudAn attempt to give courage from the husband The wife still has no idea who has gone and who has stayed the relatives of the accident victims cry out loud

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- परांडा रस्त्यावर पांडेजवळ झालेल्या अपघात चार ठार आणि सहाजण जखमी झाले आहेत. यातील जखमी व ठार झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक करमाळा येथे दाखल झाले आहेत. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात चार मृतदेह ठेवण्यात आले आहेत. तर नवरदेव- नवरीसह चौघांवर पवार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात आक्रोश सुरु आहे. नवरदेव पवार रुग्णलयात असून त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली आहे. तोंडाला रक्त लागले असून अशा स्थितीत तो सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. तर नवरीला या अपघातात कोण गेले आणि कोण राहिले यांची कल्पनाही नाही. डोळ्यात पाणी आणणारे हे चित्र सध्या रुग्णालय परिसरात आहे. ‘मेरी बेबी को कोई जानकारी नाही है’! असे नवरदेवाने ‘काय सांगता’ शी बोलताना सांगितले आहे.

परांडा- करमाळा मार्गावर पांडेजवळ (करमाळा तालुका, जि. सोलापूर) आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर सहाजण जखमी झाले आहेत. श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८ रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) अशी जखमीची नावे आहेत. यातील चिमुकल्यासह चौघेजण पवार रुग्णालयात दाखल आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. करमाळा पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. चौघांचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात आहेत. तेथे त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात होती. पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये नुकताच विवाह झालेले नवरदेव- नवरी आहेत. नवरदेवाच्या डोक्याला दुःखात झाली आहे. तर नवरीला मार लागला आहे. त्यांच्यावर पवार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *