करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत 19 व 20 ऑक्टोंबर दरम्यान नांदेड येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये रेहान मुलाणी हा राज्यात तिसरा आला असून त्याचा विभागात दुसरा व जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे. तर जयहिंद जगताप जिल्ह्यात दुसरा आला आहे. त्यांची नाडियाड (गुजरात) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुरुकुल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे व सौ. भोगे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना HOD शिंदे, HOD पवार व क्रीडा प्रशिक्षक अमोल माळी, जामदारे, ए. वाय. आव्हाड, बी. एस. आव्हाड, पवार, शिंदे, घोगरे, जगताप, गिरवले, सातव यांनी मार्गदर्शन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *