सोलापूर : 2023- 24 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.
अर्जाचा नमुना, अटी व शर्तींसाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर, दक्षिण तहसिल कार्यालयाच्यावरील मजल्यावर, सिध्देश्वर पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्र. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डी. व्ही. रोकडे मोबाईल क्रमांक- ८३२९६४४७९५ यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल आयडी posolapurdist@yahoo.com