करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील फंड गल्ली येथे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. उमा प्रफुल पवार (वय ३२) असे संबंधित महिलेचे नाव आहे. आत्महत्या झाल्याची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला. तेव्हा महिलेच्या माहेरकडील मंडळीने आक्रोश करत याची सखोल चौकशी करा, अशी मागणी करत हा खून असल्याचा आरोप केला. यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान पोलिसांकडून येथे बंदोबस्त ठेवण्यात आला. सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान संबंधित मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु होती. तेव्हा नातेवाईकांडकुन आक्रोश सुरु होता. याची सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हा मृतदेह की खून हे समजणार आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांच्यासह पोलिस उपस्थित होते. राहत्या घरात ही आत्महत्या घरात केली असल्याचे समजत आहे.