पोथरेत शनिवारी संदीप पाटील प्रस्तुत भव्य ‘स्वरदीप पहाट’

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील पोथरे येथे शनिवारी (२ नोव्हेंबर) पहाटे ४ वाजता ‘स्वरदीप पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने शनी मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून यांचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन पार्श्वगायक संदीप पाटील यांनी केले आहे.

संदीप पाटील प्रस्तुत भव्य ‘संगीतमय पहाट’ ही भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतांची दर्जेदार मैफल राज्यातील प्रसिद्ध वादकांच्या साथीने होणार आहे. पहाटे ४ वाजता ऐतिहासिक २१२१ दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळाही यावेळी होणार आहे. गायिका रोहिणी मॅडम, निवेदक रियाज पठाण, गायक कृष्णा जाधव, संगीत संजयोजक अंबरीश जहागीरदार, पॅड व मशीन वादक गौतम गुजर, ढोलकी वादक अंकित करारे हे कला सादर करणार आहेत.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व सुनील कदम हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार असून पाच विजेत्यांना पैठणी दिली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *