-

करमाळा (अशोक मुरूमकर) : परांडा- करमाळा मार्गावर पांडेजवळ (करमाळा तालुका, जि. सोलापूर) आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर सहाजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली आहे. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. यामध्ये नवरदेव- नवरी असल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे.

श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८ रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) अशी जखमीची नावे आहेत. अपघातग्रस्तांवर डॉ. गजानन गुंजकर व डॉ. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. हा अपघात पांडे येथील फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *