परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार

Thank you Shriram Pratishthan from a foreign couple

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील अभिषेक परदेशी व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या परदेशी यांनी श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कामाबद्दल आभार व्यक्त करून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांचा सत्कार केला. या दांपत्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यालयात हार, नारळ व पुष्पगुच्छ देऊन केक भरून करण्यात आला.

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात परदेशी दांपत्याचा विवाह गेल्यावर्षी झाला होता. अभिषेक परदेशी म्हणाले, प्रतिष्ठानने गेल्यावर्षी व यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात केला. सर्व नव वधू- वर, वऱ्हाडी यांची सर्व प्रकारची उत्तम सोय केली. श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कामाने मी प्रभावित झाल्यामुळे यावर्षी मी २-३ दिवस स्वयंसेवक म्हणून काम केले. भविष्यात ही प्रतिष्ठानच्या कामात मी हिरारीने सहभागी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिवटे म्हणाले, श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधार गरजू वृद्धांना, शाळकरी गरजू विद्यार्थी, रुग्णालयात मोफत जेवण देतो. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी केला. यापुढेही हे काम करणार आहोत. प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक विलास जाधव जय श्रीराम यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, दिलीप पाटील, गणेश महाडिक, शिवकुमार चिवटे, कोरे महाराज, संतोष महाराज, महादेव गोसावी, प्रसाद गेंड, निलेश चौधरी, शरद कोकीळ, संजय किरवे, अक्षय गुड, संतोष जवकर आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *