करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणाच्या पाण्यात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी पाचजणांचे आज (गुरुवारी) सकाळी शोध कार्य सुरु केल्यानंतर मृतदेह सापडले आहेत. पाण्यात तरंगताना त्यांचे मृतदेह दिसले. त्यानंतर संपुर्ण परिसरात आक्रोश सुरु झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील आणखी एक व्यक्ती बेपत्ता आहे. बोट उलटलेच्या ठिकाणापासून काही अंतरावर हे मृतदेह सापडले आहेत.
ऑईल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली! २४ तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरूच
कुगाव येथील अनुराध ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक) व गौरव धनंजय डोंगरे (वय २४) तर झरे येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता झाले होते. त्यातील पाचजणांचे मृतदेह सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली होती. करमाळा (सोलापूर) तालुक्यातील कुगाव ते इंदापूर (पुणे) तालुक्यातील कळशी दरम्यान वादळी वाऱ्यात एक प्रवासी बोट उलटली होती. यामध्ये सात प्रवासी होते त्यातील एकजण पोहत बाहेर आल्याने बचावला होता. मात्र सहाजणांचा तपास सुरु होता. आज सकाळी त्यातील पाच मृतदेह मृतदेह सापडले आहेत.
उजनीच्या पाण्यातून ‘या’ ठिकाणावरून सुरु असतो बोटीने जीवघेणा प्रवास
एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचा शोध सुरु होता. घटना घडल्याचे समजलायपासून बेपत्ता व्यक्तींचे शोध कार्य सुरु होते. मंगळवारी रात्री अंधारात तपास कार्यात अढथळा आला होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता शोध कार्य सुरु झाले. करमाळा हद्दीतील बाजूला कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात होता तर कळशीच्या बाजूनेही शोध मोहीम सुरु होती. एक पाणबुडी, तीन बोटी व २० जवान हे शोध घेत होते. त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छिमारांच्या व प्रवासी बोटीही धावल्या.
आणखी किती बळी जाणार! उजनीत यापूर्वीही उलटली होती बोट, कधी काय झाले पहा?