The first ST bus went to Ayodhya from Karmala Agar

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा आगारातील पहिली एसटी बस श्रीराम दर्शनासाठी अयोध्याला रवाना झाली आहे. सोलापूर विभागातून ही पहिली एसटी बस असल्याचे सांगितले जात आहे. परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. शेळगावला करमाळा आगर जवळ असल्याने त्यांनी येथील एसटी बस बुक केली होती. आगर प्रमुख होनराव यांनी भक्तांना सोलापूर येथून सुविधायुक्त एसटी बस उपलब्ध करून दिली आहे.

श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त अयोध्या येथे जात आहेत. त्यातूनच करमाळा येथूनही एसटी बसने श्रीराम भक्त अयोध्याला रवाना झाले आहेत. सात दिवसांचा त्यांचा दौरा आहे. नगर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जामनेर, रावेर, कुहानपूर, उजैन, भोपाळ, कटनी, रिवा, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या असा त्यांचा प्रवास असणार आहे. करमाळा आगारातून एसटी बसची पूजा करून अयोध्याकडे गाडी रवाना झाली. चालक नंदकुमार काळे व शहाजी वीर हे एसटी बस घेऊन गेले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *