सोलापूर : जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा शुक्रवारी (ता. ११) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १०.३५ वाजता पुणे विमानतळ येथून करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील हॅलीपॅडवर आगमन होणार आहे. सकाळी १०.४० ते दुपारी १२.४० वाजता कालावधीत ते स्व. मदनदास देवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता ते हेलिपॅडवरून पुणे विमानतळाकडे रवाना होणार आहेत.
